Site icon podnews24tas

पारशिवनी तालुक्यात 21 ग्रामपंचायत निवडणुकी करिता 73.86 % टक्के मतदान

पारशिवनी तालुक्यात 21 ग्रामपंचायत निवडणुकी करिता 73.86 % टक्के मतदान

एकुण 77 मतदान केंद्रा वर नागरिकांनी केले मतदान तहसीलदार प्रशांत सांगडे यांची माहिती

पोलीसांचा तगडा बंदोबस्तात मतदान शांतीपूर्वक संपन्न

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील 21 ग्रामपंचायती च्या थेट जनतेतुन सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा नेतृत्वात रविवार दिनांक 18 डिसेंबर ला सकाळी 730 वाजता पासुन ते सायंकाळी 530 वाजता पर्यंत एकुण 77 मतदान केंद्रा वर 73.86% टक्के निवडणुक मतदान शांतीपूर्वक पार पडले अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .

या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये एकुण 21 सरपंच आणि 431 उमेदवारां चे भाग्य रविवार ला ईवीएम मशीन मध्ये बंद झाले असुन मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर ला पारशिवनी तहसील कार्यालय येथे होणार आहे .

या निवडणुक निकालातुन 21 सरपंच आणि 177 सदस्य पदाची निवड होणार आहे .

या निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रा वर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

Exit mobile version